गर्दी टाळून गणेशोत्सव साजरा करा ; पोलिसांचे आवाहन (व्हिडिओ)

सावदा, प्रतिनिधी ।राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर यंदा गणेशोत्सव साजरा करताना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे . सरकारच्या धोरणानुसार गर्दी टाळून गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन पोलिसांनीही केले आहे.

गणेशोत्सव काळातील निर्बंधांबद्दल राज्य सरकारने ११ जुलैरोजी जारी केलेल्या परिपत्रकाबद्दल माहिती देताना फैज़पूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिगळे यांनी सांगितले की , राज्यात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करता यंदा गणेश मंडळांची गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी आणि घरगुती गणेशोत्सवात गणेशमूर्ती २ फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे . गणेश मंडळाचे पाच कार्यकर्ते सदैव मंडपात हजर राहतील , त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही , या कार्यकर्त्यांनी मंडपात मास्क चा वापर , शारीरिक अंतर आणि सॅनिटायझेशनची काळजी घ्यायची आहे. गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे . गणेश मंडळांनी मंडप शक्य तेवढे लहान आकाराचे ठेवावेत , देखावे आणि आरास किंवा अन्य स्पर्धा घेऊ नयेत अथवा गर्दी होईल असे उपक्रम यंदा राबवू नयेत , असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे .

 

Protected Content