सावद्यात विक्रेत्यांसाठी कोरोना तपासणी शिबीर

सावदा प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासून सावदा शहरात कन्या शाळेत सर्व भाजीविक्रेते व दुकानदारांची कोरोना टेस्ट घेण्यासाठी शिबीर घेण्यात आले.

सावदा शहरात कन्या शाळेत सर्व भाजी विक्रेते, दुकानदार यांच्यासाठी कोरोना टेस्टसाठी शिबीर सुरू आहे. आज कॅम्पसाठी नागरिकांनी गर्दी केली होती, परंतु अचानक कळले की स्वाब सँपल घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे कुणीही उपलब्ध झाले नाही. असे असताना सावदा नगरपालिकेतील कर्मचारी धीरज बनसोडे व विनय खक्के (PMAY अभियंता) यांनी पुढे होऊन स्वतः टेस्टिंग सुरू केली. एकूण १०५ जणांची टेस्ट त्यांनी यशस्वी रित्या केली. त्यासाठी त्यांचे कौतुक व अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. शिबीर यशस्वितेसाठी सचिन चोळके, विमलेश जैन, किरण चौधरी, अरुण ठोसरे, राजेंद्र मोरे, आकाश तायडे, जगदीश लोखंडे यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य होते.

Protected Content