केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत कोरोनाने बाधीत

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वत: याबाबतची माहिती एका ट्विटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या २८ लाखांच्या पुढे गेली आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते अनेक व्हीव्हीआयपी लोकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. यातच मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबत ट्विटच्या माध्यमातून माहिती जाहीर केली आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी कोरोनाची टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले आहे, असे गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. तसेच, गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत: ला आयसोलेट करून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती करत प्रत्येकाने निरोगी राहा आणि स्वत: ची काळजी घ्या, असे गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

Protected Content