जळगाव प्रतिनिधी । चहाविक्रेत्याची दुचाकी मध्यरात्री दारासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शहरातील गणेश कॉलनी परिसरात घडला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश कॉलनीत राहणारे किरण भगवान पाटील (वय-२९) हे चहा विक्री करण्याचे व्यवसाय करतात. व्यावसायासाठी त्यांच्याकडे (एमएच २०, डीए १०३६) क्रमांकाची दुचाकी आहे. शविवार ३ ऑक्टोंबर रोजी त्यांनी कामावरून आल्यावर राहत्या घरासमोर दुचाकी लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहे.