गणपूर येथे विष घेऊन एकाची आत्महत्या!

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील गणपूर येथील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील गणपूर येथील भावसाहेब दिगंबर कुमावत (वय-३५) याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची थरारक घटना आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व मृतदेहाला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान भावसाहेब यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास विजय शिंदे हे करीत आहेत.

Protected Content