खोटे नगर परिसरात साई मोरया गृपच्या सहकार्याने आरोग्य तपासणी

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या ७ दिवसांच्या लॉकडाऊन काळात संपूर्ण जळगाव शहरात महापालिकातर्फे शहरातील नागरिकांचे घरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरू झालेली आहे. यात साई मोरया गृपचे कार्यकर्ते मनपा प्रशासनाच्या सोबत नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत.

आज साई मोरया गृपतर्फे आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत खोटेनगर परिसरात तपासणी करण्यात येत आहे. खोटेनगर, सुरक्षा नगर, जिवराम नगर, धनश्री नगर, शिवशक्ती काॅलनी, ईच्छापुर्ती परिसर आदी भागांत तपासणी करण्यात आली. साई मोरया गृपचे स्वयंसेवक अध्यक्ष उमाकांत जाधव, प्रसन्न जाधव, चेतन हातकर, भटु पाटील, शुभम पाटिल, जयेश महाजन, वैभव चंद्रात्रे, धिरज महाजन, निखिल पाटील, अजय मोरे, सुदर्शन ईशी, ज्ञानेश्वर पाटील, यश मराठे मनपा कर्मचारी तनुजा पाटील, सविता पालवे, शारदा घोडे यांचे सहकार्य लाभले. या आरोग्य तपासणीला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. यावेळी आर्सेनिक अलबम ३० याचे वाटप देखील करण्यात येत आहे.

Protected Content