चाळीसगाव प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुक्यातील खेडी खुर्द खेडगाव येथे आजी-माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज संघर्ष समिती अध्यक्ष सतीश रावते यांनी केले. यावेळी खेडगाव व खेडी येथील शहिद अमोल अनंतराव साळुंखे व शहिद राकेश आहिराव यांच्या स्मारकाला मानवंदना देवून आजी व माजी सेनिकांची मिरवणूक गावतुन काढण्यात आली. यावेळी वाघळी, दस्केबर्डी, बहाळ,पोहरे, करमूड, खेडी खेडगाव, जुवार्डी आदी गावांमधील आजी-माजी जवान उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रविण मगर यांचा प्रमुख सत्कार करण्यात आले. यासोबत उपस्थित जवानांना सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. तर शहिदांच्या आई व वडिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रविण मगर, वाल्मिक गरूड, आबासाहेब परमेश्वर रावते, प्रफूल्ल साळुंखे, सतिष रावते ,मारती काळे, परेश वानखेडे, सरपंच खेडी, रघुनाथ महाजन, खेडगाव सरूबाई बबन नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
गावातून जवानांची मिरवणूक काढली असता महिलांनी रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या होत्या. यशस्वीतेसाठी सैनिक जितेंद्र चौधरी, संभाजी हाडपे, पोपट महाजन, विलास जाधव, आत्माराम पाटील, सिताराम पाटील, पतींगराव पाटील,शामराव पाटील ,संजू पाटील ,ज्ञानेश्वर माळी, हिलाल माळी, अभिमन्यु रावते, विवेक जधाव, साहेबराव न्हावी, नितीन खैरनार, रामकृष्ण अहिरे, मनोहर महाले, प्रविण महाजन, समाधान पाटील, आनंदा माळी, कैलास सोनवणे,आनंदा पाटील व मोरे यांनी केले.