खुशखबर : घरगुती सिलेंडरच्या दरात कपात !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सब्सिडी नसलेल्या सिलेंडरचे दर ६१ रूपयांनी कमी करण्यात आले आहे. तर मुंबईत ६२ रूपये, कोलकातामध्ये ६५आणि चेन्नईमध्ये ६४.४० रूपयांची कपात करण्यात आली आहे.

 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये सब्सिडी नसलेल्या सिलेंडरचे दर क्रमश: ७४४ रूपये, ७७४ रूपये, ७१४.५० रूपये आणि ७६१.५० रूपये करण्यात आले आहे. एलपीजी सिलेंडरचे हे नवे दर १ एप्रिल म्हणजे आजपासून लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो कमर्शियल सिलेंडरचे दर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत क्रमश: १,२८५.५० रूपये, १,३४८.५०रूपये, १,२३४.५० रूपये, आणि १,४०२ रूपये असे असणा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

🔔फेसबुक पेज : https://bit.ly/2QSCeHB

🔔युट्यूब पेज : https://bit.ly/2UuRmx3

Protected Content