कोरोना : विद्यार्थी घेताय घरी बसून अभ्यासाचा आनंद

जळगाव प्रतिनिधी । जगभर कोरोनाचे थैमान सुरू असताना, भारतात सर्वत्र लॉकडाऊन असतांना शिक्षणक्षेत्रही त्यातून सुटले नाही. मात्र सामाजिक बांधीलकी जपासत डॉ.अविनाश आचार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून सुट्टीत अभ्यासाचा आनंद घेत आहे.

संचारबंदी असल्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले असल्याने सुट्टीत अभ्यास करण्यासाठी डॉ. अविनाश आचार्य शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी व्हॉटसॲप गृप बनवून घेतला. सुट्टीच्या काळातही नियमितपणे विद्यार्थ्यांशी संपर्कात आहे. १६ मार्चपासून तर आत्तापर्यंत शाळा बंद असतांना शिक्षक दृक्श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन व त्यांच्या शैक्षणिक शंकांचे निरसन करत आहे. शाळेतील १ ते ४ च्या २० वर्गांचे २० व्हाट्सॲप ग्रुप असून त्या मार्गाने गेल्या १५ दिवसापासून शिक्षक विद्यार्थ्यांना दररोज घरचा अभ्यास देत आहे. तसेच झूम अँपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील ज्या अडचणी आहे. त्या समजून घेत असून, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून अध्यापन करत आहे. याचा परिणाम असा की, विद्यार्थी घरी बसूनच आनंदाने अध्ययन करून अभ्यास करत आहे. तसेच सामाजिक बांधीलकी म्हणून शिक्षक कोरोना विषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करत आहे. जवळपास १५०० पालकांपर्यंत कोरोनावर माहिती देत असून घोषवाक्य व कवितेच्या ओळीतून कोरोना पासून कसे दूर राहावे आपल्या परिवाराची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती देत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content