धक्कादायक : तलफ भागवण्यासाठी तळीराम फोडताय दारूची दुकाने !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरु केलाय. यामुळे तळीरामांची मोठी गैरसोय होतेय. परंतू राज्यातील विविध भागातील तळीरामांनी आपली तलफ भागविण्यासाठी चक्क दारूची दुकानं फोडत असल्याचे समोर आले आहे.

 

नागपुरामध्ये दोन मद्यपींनी ‘सदर’ परिसरातील सुविधा बारच्या मागील बाजूची भिंत तोडून आत प्रवेश करत लाखो रुपयांची दारू लंपास केली. दरम्यान, दोघं चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. विशेष म्हणजे दोघं चोरट्यांनी रोकडला हात सुद्धा लावला नाही. त्यांनी फक्त दारू पळवली. अमरावती शहराच्या वलगाव मार्गावरील देशी दारूच्या गोदामाच्या पाठीमागून भिंतीला मोठे भगदाड करून चोरट्यांनी दारूच्या २५० पेट्या लांबवल्या आहेत. यवतमाळ जिल्हयातील झरी येथील एक बिअर बार फोडला. यातील एकून ३३ हजारांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू चोरट्यांने लंपास केल्या आहेत.

दारूसाठी व्याकुळ झालेल्या तळीरामांना सांगली आणि मिरजेत थेट बंद असलेली 2 दारूची दुकाने फोडून दारूच्या बाटल्या लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. तर सोलापुरातील विजापूर रोड येथील असलेल्या गुलमोहर दारूचे वाईन शॉप फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी या दुकानात महागड्या दारूच्या बाटल्याएंवजी फक्त ते रोज पित असलेल्या विशिष्ट ब्रँडच्याच दारूच्या बाटल्याच चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

🔔फेसबुक पेज : https://bit.ly/2QSCeHB

🔔युट्यूब पेज : https://bit.ly/2UuRmx3

Protected Content