अन्न व औषध प्रशासनाचा चाळीसगाव येथे छापा

चाळीसगाव प्रतिनिधी । नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आज चाळीसगावात पानमसाला, तंबाखू, गुटखा व सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी ४ जण व तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करणे सुरू होते.                          

चाळीसगावात गेल्या काही दिवसांपासून तंबाखू, गुटखा व सुगंधित तंबाखूत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांना आजारांना बळी पडावे लागत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीची दखल घेत नाशिक व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज चाळीसगावात धडक मोहीमेत चार जण व तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली. सदाशिव स्वीट अष्टभुजा, समर्थ ट्रेंड्स व सोनल सुपारी अष्टभुजा मार्केट आदी दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात अनुक्रमे १८०० पॉऊच ५७३० रूपये, १२५०० पॉऊच १५४२० रूपये व १८०० रूपये किंमतीचे साठा जप्त करण्यात आले. यावेळी नितेश पक्का, रविंद्र वाणी, राजेश वाणी व सतिष वाणी आदींवर कारवाई करणे सुरू होते. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ अशा विविध कलमान्वये गुन्हा नोंदविणे सुरू होते. या कारवाईत नाशिक विभागाचे सहायक आयुक्त सि. डी. साळुंखे, सहायक आयुक्त उदय लोकरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी राम भडकर (जळगाव) व किशोर साळुंखे आदींचा समावेश होता.

 

Protected Content