जागृती हाऊसिंग सोसायटीमध्ये बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जागृती हाउसिंग सोसायटी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकूण ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरसिंग नयनसिंग पाटील (वय-४७, रा. जागृती हाऊसिंग सोसायटी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार २९ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान या संधीचा फायदा घेत आज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या साखळ्या आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी ५ वाजता हरसिंग पाटील घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.  त्यांच्या तक्रारीवरून ९ नऊ वाजता  रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.

Protected Content