निंभोरा प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या महावितरण कंपनीच्या खिर्डी कक्षातील १० हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या तार अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार २७ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र विद्यूत महामंडळाची शाखेचे खिर्डी यांच्या शेतातील खिर्डी शिवारातील विजय भागवत तायडे यांच्या शेतात असलेल्या इलेक्ट्रिक पोल व इतर सामान ठेवण्यात आले आहे. २७ डिसेंबर रोजी रात्री १० ते २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअरच्या तारांचे बंडल चोरून नेले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. आम्ही ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’च्या बातम्या चोरतो.
सहाय्यक कनिष्ठ अभियंता योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार अन्नवर तडवी करीत आहे.