मोदी सरकारच्या सातव्या वर्षपुर्ती निमित्त चैतन्य तांडा येथे मास्क व सॅनिटाझरचे वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून चैतन्य तांडा येथे मास्क व सॅनिटाझरचे वाटप भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम यांच्याहस्ते करण्यात आले.

तालुक्यातील चैतन्य तांडा येथे मोदी यांच्या केंद्र सरकारला नुकतीच ७ वर्ष पूर्ण झाल्याने मास्क व सॅनेटाईझचे वाटप भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील निकम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ४०० मास्क व ४०० सॅनेटाईझची बॉटल वाटप करण्यात आले. बोढरे ग्रामपंचायतीने अवादा सोलार ग्रृपतर्फे मास्क व सॅनिटाझर उपलब्ध करून दिल्याने चैतन्य तांडा येथे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाची तिसरी लाट वेसीवरच थोपविण्यासाठी चैतन्य तांडाने आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. बोढरे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाब राठोड, उपसरपंच अर्जून राठोड व अविनाश राठोड यांच्या प्रयत्नातून हे मास्क व सॅनिटाझर उपलब्ध झाले आहेत. याबद्दल करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी ग्रामपंचायतीकडून आभार मानले आहेत. यावेळी सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, राजेंद्र चव्हाण, संदीप पवार, साईनाथ राठोड, प्रवीण चव्हाण, रमेश चव्हाण, मधुकर राठोड, भावलाल चव्हाण, रघुनाथ राठोड व विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नागरिक जुलाल राठोड यांनी यशस्वी प्रयत्न केले.

Protected Content