ॲम्प्लीफायरसह डीजेचे साहित्य चोरीला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नागेश्वर कॉलनीतील लाईफ स्टाईल अपार्टमेंटजवळून २९ हजार रूपये किंमतीचे डी.जे.चे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीक उल्लाउद्दीन पिंजारी (वय-३२) रा. समता नगर, साई मंदीराजवळ नागेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. डीजेचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी नागेश्वर कॉलनीतील लाईफस्टाईल अपार्टमेंटजवळ एका ठिकाणी डी.जे. वाजविण्याचे साहित्य ठेवले होत. अज्ञात चोरट्यांनी यापैकी एकुण २९ हजार रूपये किंमतीचे लॅपटॉप, तीन ॲम्प्लीफायर आणि इतर साहित्य चोरून नेले. हा प्रकार २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी रफीक पिंजारी यांनी शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजिज पाटील करीत आहे.

Protected Content