रावेर, प्रतिनिधी । रावेर पोलिसांनी तालुक्यातील खिरवड नेहते परीसरात नाल्याकाठी सुरु असलेल्या अवैध दारू भट्टयावर धाड टाकून सुमारे ४२ हजार रूपयांचा रसायन नष्ट केले आहे. या बाबत रावेर पोलिस स्थानकात पाच जणाविरुध्द वेग-वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या बाबत माहिती अशी की, आज पहाटच्या सुमारास गुप्त माहिती वरुन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक आपल्या पथकासह खिरवड शेतीशिवारात नाल्या लगत अवैध दारूच्या भट्टीवर छापा टाकला. यामध्ये नऊ हजाराचे रसायन नष्ट केले व किरण धनु कोंगे विरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर जवळ असलेल्या धाड टाकून १३ हजार पाचशे रूपयाचे अवैध दारूचे रसायन नष्ट करून प्रकाश किटकुल गाढे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. यानंतर धाड टाकून १० हजाराचे रसायन नष्ट केले व जनार्दन इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला. नेहता शिवारामध्ये धाड टाकून २ हजार सातशे रुपये किमतीचे रसायन नष्ट करत कैलास पाव्हणु तायडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. नेहते शिवारामध्ये ३ हजार सहाशे रुपये किमतीचे रासायन नष्ट केले व सजंय नामदेव तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे एकूण वेग-वेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील सर्व पाचही आरोपी फरार झाले आहेत. या पथकात पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. सुरेश मेढे, श्रीराम कांगणे, योगेश चौधरी, विशाल पाटील, मुकेश तडवी, महेश मोगरे आदीचा सहभाग होता.