गेंदालाल मिल परिसरात तरूणीचा विनयभंग

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना शनिवारी उघडकीला आली. याप्रकरणी रात्री उशीरात शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहतात. २१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास असरफ खान गुलशेर खान रा. गेंदालाल मिल याने तरूणाची हात पकडून ‘माझ्या सोबत चल आपण दोघे लग्न करू’ असे बोलून अश्लिल हातवारे करून विनयभंग केला. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

Protected Content