जळगाव प्रतिनिधी । ऑलिंपिक स्पर्धे भारताला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शहरातील कुस्तीप्रेमींनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून मागणीचे विनंती पत्र देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक हे खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले होते, त्यांच्यानंतर 16 जणांनी भारताला पदक मिळवण्याची कामगिरी केली. या सर्व सोळा जणांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेले आहे. मात्र पहिले पदक देशाला मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव मात्र या पुरस्कारापासून आजपर्यंत वंचित राहिलेल्या आहे. .
खाशाबा जाधव यांच्या निधनानंतरही तत्कालीन राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही
खाशाबा दादासाहेब जाधव यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे या साठी अनेकदा अर्ज प्रस्ताव शिफारशी देऊनही या पुरस्कारापासून त्यांना वंचित रहावे लागले. हे एक खेदाची व दुर्दैवी बाब आहे यामुळे आम्ही सर्व कुस्ती प्रेमींच्या व पैलवानांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी आता भारत सरकारने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून भारताला ऑलिंपिकमध्ये कुस्ती स्पर्धेत पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. अशी मागणी केली. मागणीचे पत्र देतांना जळगाव शहरातील पैलवान विजय वाडकर वस्ताद , सुनील शिंदे, राहुल पाटील , आशिष ठाकरे, कल्पेश मराठे, कार्तिकी आसारे, बंटी शिंदे, बाळा सपकाळे ,जयेश हिंगोले ,विपुल पाटील, राहुल गवळी, प्रशांत पाटील तसेच कुस्तीप्रेमी पियुष नरेंद्रअण्णा पाटील, देविदास ठाकरे, सूनय पाटील ,राहुल शर्मा, योगेश निंबाळकर, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.