डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात

Kojagiri Purnima at Dr. Avinash Acharya Vidyalaya

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागातर्फे कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात महिनाभरापासून सुरु असलेल्या भुलाबाई महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयात शिशू गट, बाल्यगट व बालगटाच्या विद्यार्थ्यानी भुलाबाईच्या गीतांवर नृत्य व दांडिया सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे शाळेच्या कोषाध्यक्ष हेमा अमळकर, शालेय समिती सदस्या रचना जोशी, मुख्याधापिका कल्पना बाविस्कर, योगिता शिंपी, शैलेजा पप्पू, रोहिणी कुलकर्णी आणि पालकांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन व आरती करण्यात आली. कार्यक्रम प्रमुख अर्चना कोलते यांनी विद्यार्थ्यांना कोजागिरी पौर्णिमाचे महत्व सांगितले. त्यानंतर प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना दूध व खाऊ देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याधापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content