बुलढाणा, अमोल सराफ । निसर्ग हाच आपला गुरू आहे. निसर्गच आपल्याला घडवतो आणि आपल्या या गुरूला आपण उतराई होण्यासाठी आज खामगावच्या मिशन २ या सेवाभावी ग्रुपच्या कोरोना वारीयर्सनी एकत्र येत उजाड माळरानात वृक्ष लावून निसर्गाला दिली अनोखी गुरुदक्षिणा दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेवाभावी मिशन ०२ ग्रुपच्या वतीने नेहमी पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जातात. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून वृक्ष लागवडी पर्यावरण त्यादृष्टीने योगदान देण्याकरिता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावमध्ये ज्या कुणी कोरोना वॉरीयेर्सने आपले योगदान दिले आहे अशांकडून जवळपास ५०० वृक्ष लागवड करून व त्यांचा सन्मान करून आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वारीयर्सच्या हातून लागवड करून त्याला सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम मिशन ०२ परिवाराने घेतली आहे. त्याकरिता आज सकाळीच या उपक्रमात गावालगतच्या घाटपुरी भागांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त हा उपक्रम राबून जणूकाही निसर्गाला एक गुरुदक्षिणा दिल्याचं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पर्यावरणाचा समतोल साधणे आणि होत असलेली वृक्षतोड यावर समतोल साधणे हा या मिशन २ ग्रुप चा उद्देश साधण्यात आला आहे.
https://www.facebook.com/watch/?v=2689647901355120