मोहराळा हरीपुरा येथे दफनभूमीत वृक्षारोपण

 

यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा हरीपुरा ग्रामपंचायतच्यावतीने जागतिक आदीवासी दिनाचे औचित्य साधुन आदीवासीच्या दफनभुमीच्या परिसरात विविध जातीच्या सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली .

 

यावल तालुक्यातील मोहराळा हरीपुरा ग्रामपंचायतच्या माध्यमातुन आदीवासी तडवी समाज दफनभुमीच्या आवारात मनरेगा योजनेतून हे विविध जातींच्या एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण सरपंच सौ . नंदा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी  उपसरपंच जहांगीर तडवी , ग्रामसेवक राजु महाजन, रोजगारसेवक व ग्रा पं सदस्य यशवंत पाटील , प्रमोद महाजन , भावना महाजन , रिहाना तडवी , राजु तडवी , रूखसाना तडवी , अनील अडकमोल, भरत महाजन , सुलेमान नहाळ , सामाजीक कार्यकर्ते गोपाळ महाजन , ग्रा पं कर्मचारी संजय महाराज व इतर कर्मचारी आणी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .

 

Protected Content