जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील घरकाम व शेत मजूरी करणाऱ्या महिलांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी खान्देश कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात खान्देश कामागार संघटनेचे सरचिटणीस विकास आडवाणी, उदय भट यांच्या नेतृत्वात काढण्यात येत आहे.
सामाजिक सुरक्षा म्हणून दरमहा ३ हजार पेन्शन मिळावे, रेशनदुकानातून किराणा साहित्य मिळाव्यात, महिलांना हक्काचे घर मिळावे, त्यांच्या शिकलेल्या मुलांना २६ हजार पगाराची नोकरी मिळावी, रेशनमधून धान्य मिळावे, घरघुती गॅसच्या किंमत कमी कराव्यात यासह प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश कामागार संघटनेच्या वतीने शहरातील नवीन बी.जे.मार्केट येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी खान्देश कामागार संघटनेचे सरचिटणीस विकास आडवाणी, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सरचिटणीस उदय भट यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत महिलांच्या मागण्या शासनाकडून मान्य होत नाही, तोपर्यंत संघटनेच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चा व निदर्शने सुरूच राहिल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील घरकाम व शेत मजूरी करणाऱ्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.