शिरसाळा येथील गावकूसाच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे कार्य ‘जैसे थे’

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीने गेल्या ८ वर्षांपूर्वी गावातील गावकूसाच्या रस्त्याचे अतिक्रमण काढण्याचे कार्य करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव मंजूर झाला होता. परंतू अद्याप येथील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.

गावातील ग्रामपंचायत कार्यालय ते मरीमाता मंदिर पर्यंत या गावकुसाच्या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात येणारे अतिक्रमण जैसे थे तसेच असल्याची वस्तुस्थिती आहे.  बोदवड तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय ते मरीमाता मंदिर पर्यंत असलेल्या गावकुसाच्या रस्त्याचे अतिक्रमण काढण्याचे कार्य ठरवून ग्रामसभेचा ठराव मंजूर करून देखील आजपोवतो सदरचे अतिक्रमण जैसे थे तसेच असल्याची वस्तुस्थिती आहे.ग्रामसभेचा ठराव मंजूर करण्यात आला असूनही सदरचे काम आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. सदरचे अतिक्रमण किमान आता तरी निघेल या आशेने गावकऱ्यांनी तहसीलदार बोदवड यांना निवेदन देत सदरचे अतिक्रमण काढण्याची विनंती केली आहे. किमान आता तरी सदरचे अतिक्रमण निघेल अशा आहे.

Protected Content