मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जी.जी. खडसे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग युवती सभा अंतर्गत 28 फेब्रुवारी ते 4 मार्च एकूण पाच दिवस महाविद्यालयीन मुलींच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत ठरणारी व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार “मिशन साहसी”अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
मिशन सहासी अभियानांतर्गत युवती साठी खुली चर्चा ,गट चर्चेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवर आरोग्य विषयक माहिती व समस्यांविषयी, यशस्वी महिला उद्योजक, स्वसंरक्षणार्थ कराटे योगशिक्षक येऊन या विद्यार्थ्यींनीशी खुली चर्चा करण्यासाठी युवती सभेने हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .यातून त्यांचा आरोग्य- शारीरिक ,मानसिक आरोग्य विषयक, आर्थिक, भावनिक ,सामाजिक अशा विविध अंगांनी विकसित होऊन एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे व नवीन साहस, धैर्य निर्माण करण्याचे काम या मिशन साहसी अभियानातून करण्याचा उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले.
28 फेब्रुवारी 2023, मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता ” हस्तकलेतून स्वयंरोजगाराची संधी” या विषयावर मा. सौ .मनीषा चौधरी यांनी ज्वेलरी मेकिंग या विषयाची सविस्तर माहिती तसेच त्यासाठी आवश्यक साहित्याची ओळख करून दिली तसेच प्रात्यक्षिकाद्वारे वेगवेगळ्या ज्वेलरी बनवून दाखविल्या व मुलींकडून प्रात्यक्षिक करून घेतले ते करताना मुलींशी चर्चात्मक संवाद साधण्यात आला.
याप्रसंगी सुरुवातीला मिशन साहसी अभियानासुरुवात दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.हेमंत महाजन यांनी मार्गदर्शन करताना पारंपारिक शिक्षणासोबत हस्तकलेच्या शिक्षणाचे महत्त्व व त्यातून निर्माण होणा-या रोजगाराच्या संधी याविषयी माहिती दिली. मुलींनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्याचा अनुभव घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद व आत्मविश्वास दिसत होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी डॉ.संजीव साळवे प्रा. सविता जावळे , डॉ. ताहिरा मिर,प्रा.सीमा राणे यांनी परिश्रम घेतले. सदर अभियानामध्ये महाविद्यालयातील 50 मुलींनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रतिभा ढाके युवती सभाप्रमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेखा चाटे यांनी केले.