कुटुंबियाचा शेवटचा कुलदीपक ही अखेर विझला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात बारावीच्या विद्यार्थ्याने १२ वी च्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागातील रहिवासी राजदत्ता नरेंद्र पवार (वय – १८) हा इयत्ता १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत होता. नुकतीच सर्वत्र १२ वी ची परीक्षा सुरू आहे. राजदत्ता पवार याने वडगाव ता. सोयगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेवुन १२ वी ची परीक्षा देत होता. २७ फेब्रुवारी रोजी फिजिक्सचा पेपर राजदत्ता याने दिला होता. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता हा घरीच होता. सायंकाळी ५ वाजता राजदत्ता याने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ता यांचे मित्र ५ वाजेच्या सुमारास राजदत्ता याचे घरी आले असता राजदत्ता हा घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला असता राजदत्ता पवार हा घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आल्याने मित्रांनी एकच आक्रोश केला. राजदत्ता याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत. राजदत्ता याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. राजदत्ता याच्या अकस्मात निधनाने परिसरात एकच खळबळ उडाली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पवार कुटुंबियाचा शेवटचा कुलदीपक ही अखेर विझला
राजदत्ता नरेंद्र पवार याच्या आईचे हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यानच्या काळात राजदत्ता याचे वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र नरेंद्र पवार यांना देखील लिव्हर चा आजार झाल्याने त्यांचे देखील दुर्दैवी निधन झाले आहे. राजदत्ता हा पवार कुटुंबियाचा एकुलता एक मुलगा, दोन बहिणी त्यातील एका बहिणीचे लग्न झाले असुन एक बहिण नाशिक येथे शिक्षण घेत आहे.

घरात कोणीच नसतांना राजदत्ता ने उचलले टोकाचे पाऊल
राजदत्ता हा लहान असतांनाच आईचे निधन झाल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले. कालांतराने राजदत्ताचे वडिल नरेंद्र पवार यांना लिव्हरच्या आजाराने ग्रासले. त्यात त्यांचे देखील दुःखद निधन झाले. अल्पवयातच संपूर्ण जबाबदारी राजदत्ताच्या खांद्यावर आली. उच्च शिक्षित होवुन मोठ्या पदावर नौकरी मिळावी ही जिद्द उराशी बाळगून राजदत्ता याने तयारी सुरू केली. नाशिक येथे खाजगी क्लासेस करुन वडगाव ता. सोयगाव येथे १२ वी ची परीक्षा देत असतांनाच सावत्र आई माहेरच्या मंडळींसोबत रामेश्वर येथे देव दर्शनाला गेल्या आहेत. एका बहिणीचे लग्न झाले असुन दुसरी बहिण नाशिक येथे शिक्षण घेत असुन २८ फेब्रुवारी रोजी घरी कोणीच नसतांना तसेच याच दिवशी १२ वी चा पेपर देखील नसतांना राजदत्ता घरात एकटाच होतो. दुपारी खानावळीतील जेवण केल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राजदत्ता याने घरातील साडीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content