पत्रकाराची निर्दोष मुक्तता, जिल्हा न्यायालयाचा निकाल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील पत्रकार राहुल महाजन हे २०१६ साली पाचोरा पोलीस स्थानकात बातमी संदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्हा न्यायालयाने पत्रकार राहूल महाजन यांची निर्दोष मुक्तता केली आहे. गुरुवार, ११ मे रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि सन २०१६ साली बातमी संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलेले पत्रकार महाजन हे पाचोरा पोलीस ठाण्यात गेले होते, यादरम्यान पोलीस निरीक्षक यांच्या दबावाखाली येऊन पोलीस कर्मचारी यांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.   जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायधीश बोहरा यांच्या न्यायालयात या खटल्यावर कामकाज चालले. यात यामध्ये पाचोरा येथील ॲड मानसिंग सिद्धू यांनी बचाव पक्षाची बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला असून पत्रकार राहुल महाजन यांच्यावर कश्या पद्धतीने पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता हे कोर्टासमोर मांडले.  यात सुनावणी अंती पत्रकार राहूल महाजन यांची न्यायाधीश बोहरा यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. राहूल महाजन यांच्या तर्फे ॲड मानसिंग सिद्धू यांच्यासोबत त्यांचे सहकारी ॲड.प्रशांत भावसार यांनी कामकाज पाहिले.

Protected Content