“वैयक्तिक लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या” काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांना मागणी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी | “वैयक्तिक लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या” अशी मुक्ताईनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

आज सोमवार, दि.१० जानेवारी रोजी संपकरी एसटी महामंडळाचे कर्मचारी यांनी ‘मुक्ताईनगर एस.टी.डेपो’मध्ये काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना डेपोमध्ये बोलवून त्यांच्या बाबतीत काँग्रेसच्या नेत्यांनी वैयक्तिक लक्ष घालण्यासाठी आग्रह केला. त्यानुसार त्यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात “काँग्रेस कमिटी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे सर्व मंत्री महोदय व आमदार महाराष्ट्र राज्य आपणास विनंतीपूर्वक निदर्शनास आणून देतो की, “आपल्या महाराष्ट्रामध्ये मागील ६५ दिवसापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेलेले असून अद्यापपर्यंत त्यांच्या मागण्यांवर महाविकास आघाडीकडून तोडगा निघाला नाही. तातडीने त्यांच्या वैयक्तिक, पारिवारिक आणि जनतेच्या होणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेऊन आपल्या स्तरावर त्यांना त्वरित न्याय द्यावा” अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!