भुसावळात रक्तदान शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ प्रतिनिधी । राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्या अनुषंगाने सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेने गुरुवार २४ रोजी श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर, आयडीबीआय बँक शेजारी रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्षभरापासून रुग्णसेवा करत असलेल्या श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डायलिसिस युनिटचे उदघाटन मान्यवारांचे हस्ते करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्धघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पलटणकर , रुग्णालयाचे डॉ.नितीन पाटील, डॉ . गणेश पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. महेश पांगळे, डॉ. कुशल पाटील,सुराणा ग्रुपचे अशोक सुराणा, बिपीन सुराणा व संमकीत सुराणा, महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेश्वरी नेवे, श्री रिदम मेडिकलचे गौतम चोरडिया, महाजन लॅबच्या श्रीमती महाजन, नेत्रम रुग्णालयाचे सुनील मेश्राम, समाजसेवक जे.बी. कोटेचा आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांना गुलाबाचे रोप देऊन स्वागत करणयात आले. महिलांनी रक्तदानासाठी विशेष पुढाकार घेतला. तर निलेश फंड याने ३० व्यादा रक्तदान केले म्हणून डिवायएसपी वाघचौरे यांच्या हस्ते त्यास गौरविण्यात आले. महिलांसोबत पुरुषांनी सुद्धा रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात प्रियांका चौरसिया व तिचे वडील जितेंद्र चौरासिया यांनी सोबतच रक्तदान केले. अशी रक्तदानाची भुसावळ परिसरातील हि पहिलीच घटना आहे . तसेच महिलांनी रक्तदानासाठी शिबीर आयोजित करण्याचीही प्रथमच वेळ असून सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांचे नेत्रम हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्या हस्ते डायलिसिस युनिटचे उद्धघाटन करण्यात आले. मान्यवरांनी रुग्नालयातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली. तसेच कॅथलॅब ला भेट देऊन पामी शस्रक्रियेची माहिती जाणून घेतली. या शिबिर स्थळी आरपीएफ उपनिरीक्षक समाधान वाहूलकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक नरवाडे, शहीद भगतसिंग फाउंडेशनचे निलेश रायपुरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रितेश चिपड (जैन)सह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी माया चौधरी, महानंदा पाटील , अनुराधा टाक, प्रतिभा विसपुते , निकिता खुशलानी, सविता चौक, संगीता भामरे, अनिता कोळी, हर्षाली पाटील, निलेश फंड, पंकज नाले, उमेश नेवे , जे. बी. कोटेचा यांनी परिश्रम घेतले.

Protected Content