तारखेडा ते गाळण रस्त्याबाबत बैठक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तिसऱ्या रेल्वे लाईनमुळे तारखेडा ते गाळण शिवकालीन रस्ता बंद करून नये यासाठी सेंट्रल रेल्वे अधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या संदर्भात अधिक असे की, जळगाव ते मनमाड या दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या तिसऱ्या रेल्वे लाईनमुळे पाचोरा तालुक्यातील तारखेडा ते गाळण हा शिवकालीन रस्ता संपुष्टात येत असल्याचे सद्यस्थितीत चित्र निर्माण झाले असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता व्हावा या विषया संदर्भात सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत सेंट्रल रेल्वे भुसावळचे बांधकाम विभागाचे उप मुख्य अभियंता पंकज महादेव धावारे, सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रमोद कुमार यांचे सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, अनिल धना पाटील, तारखेडा बु” सरपंच विकास पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, संजय गोसावी, तारखेडा खु” सरपंच नवल गुजर, हनुमान वाडी सरपंच आत्माराम राठोड, वि. का. सोसायटी चेअरमन डॉ. विजयसिंग राजपुत, गाळण बु” सरपंच राजेंद्र सावंत, ईश्वर पाटील, संतोष पाटील, संतोष राठोड, विष्णुनगर सरपंच जगन राठोड सह स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, प्रविण ब्राह्मणे उपस्थित होते.

Protected Content