सुखकर्ता फाउंडेशनतर्फे गरजूंना तांदुळाचे वाटप

एरंडोल प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये अनेक कुटुंबांची उपासमार होत असल्याने येथील सुखकर्ता फाऊंडेशनतर्फे गरजूंना १० क्विंटर तांदुळाचे वाटप करण्यात आले.

कोरोना या जीवघेण्या आजारामुळे सर्व व्यवहार, काम धंदे ठप्प झाले असून गरीब, सामान्य जनतेला मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण देखील मुश्किल झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एरंडोल येथील सुखकर्ता फाऊंडेशनचे संचालक नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर यांचे तर्फे गरीब, गरजूंना घरोघर जाऊन मोफत तांदुळाचे वाटप करण्यात आले. डॉ. ठाकूर यांनी विखरण रोड, म्हसावद रोड झोपडपट्टी, धरणगाव रोड वरील झाडू विक्रेते तसेच जुना धरणगाव रोड वरील झोपडपट्टीतील गरीब लोकांना प्रति घर एक किलो तांदूळ असे १००० किलो तांदुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी संचार बंदीचे उल्लंघन न करता आणि सोशल डिस्टन्सचे पालन करत तांदुळ वाटप करण्यात आले. यावेळी महात्मा फुले युवा क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष कैलास महाजन,पत्रकार किशोर मोरणकर, दिपक बाविस्कर आदी उपस्थित होते.

Protected Content