हनुमंतखेडे येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गोर्‍हा दगावला

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील हनुमंतखेडेसिम येथील शेतकर्‍याच्या शेतात रात्रीच्या वेळी हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गोरहा दगावला आहे.

हनुमंतखेडेसिम येथील शेतकरी किशोर राजाराम पाटील यांच्या शेतातील गट नं.३० व १ ब येथे दि.१३ एप्रिलच्या रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास शेतात असलेला गीर जातीचा गोर्‍हा (वय ४ ते ५ वर्ष) हा हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात दगावला असल्याची तक्रार शेतकरी किशोर राजाराम पाटील यांनी वनविभागास केली आहे. यामुळे नुकसानीचा मोबदला मिळावा अशी विनंती त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content