मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खडसे महाविद्यालयातील शिक्षणपूरक उपक्रम समिती व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक उद्योजकता दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय पवन सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वानुभव कथन करत जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी या त्रिसूत्रीचा अंगीकार करत आपण जीवनात स्व :विकास साधू शकतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत निर्माण करावयाचा असेल तर प्रत्येकाने उद्योजक होऊन आत्मनिर्भर व्हायला हवे;असा मौलिक संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. तर दुसरे प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर एस.बी. साळवे यांनी महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर असलेल्या विविध विद्यार्थी विकास योजनांचा फायदा घेऊन विद्यार्थी स्वयं विकास साधू शकतो. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने नेहमीच सजग असले पाहिजे असे सांगितले. तर प्राचार्य डॉक्टर एच.ए. महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना उद्योगशिल बना व राष्ट्र उभारणीत आपले योगदान देऊन राष्ट्राला जागतिक महासत्ता बनवा, असे आवाहन केले.
प्रस्तुत कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक पी.पी. चौधरी , प्राध्यापक सविता जावळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक व्ही.बी.डांगे, प्राध्यापक राजन खेळकर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस.एल.खडसे यांनी तर प्रस्ताविक प्राध्यापक डाँ. गणेश शालिग्राम चव्हाण यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक दत्तात्रय कोळी यांनी मानले.