खडसे महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन

 

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात नुकतेच Application Writting आणि CV Writting तसेच “Employability Skills” या विषयावर विजेंद्र पाटील, डॉ बालाजी तोटावार आणि उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

1 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. एस. बी. साळवे आणि डॉ.अतुल बढे यांनी विद्यार्थ्यांना अनुक्रमे “How to prepare for the Interview” आणि “How to face An Interview” या विषयावर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नोकरी कशी मिळवावी याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर एच. ए.महाजन उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये नोकरी क्षेत्रामध्ये संधी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. व विद्यार्थी आपल्या लक्षापासून कधीही दूर नसावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील हे लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी जे. पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजन खेडकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा एस. एल. खडसे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सी.जे. पाटील, डॉ. टि.के. पाटील, प्रा. एस.एल. खडसे, प्रा. राजन खेडकर, प्रा. नितीन हुसे आणि डॉ. चाटे मॅडम व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content