तांबापूर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा डोळा मारत हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोर उभी असतांना तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख हा दारूच्या नशेत तिच्या घराच्या अंगणात उभा राहिला आणि मुलीकडे पाहून डोळा मारला. तसेच तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. दरम्यान पिडीत मुलीने परिवारासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content