खडकी ब्रु. ग्रामपंचायतीमध्ये तत्कलीन सरपंचासह ग्रामसेवकांद्वारे अपहार : पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  तालुक्यातील खडकी ब्रु. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकांनी एल.ए.डी. बल्ब शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पध्दतीने खरेदी करून सव्वा दोन लाखांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच मिराबाई आनंदा जाधव, ग्रामसेवक विजय रघुनाथ चौधरी व ग्रामसेवक ईश्वर शांतीलाल भोई आदींनी संगनमताने एल.ए.डी. बल्ब हे शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पध्दतीने खरेदी करून ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २,३४,५२० रूपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. सदर एल.ए.डी. बल्बची खरेदी ३ डिसेंबर २०१५ ते ६ नोव्हेंबर २०१७ रोजी दरम्यान केलेली आहेत. सदर घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहेत. सहायक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार ( पंचायत समिती चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ४२०,३४ नुसार शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.

Protected Content