जळगाव प्रतिनिधी । खंडेरावनगरात घराबाहेर उभ्या केलेल्या रिक्षेतून बॅटरी, स्टेपनी व पान्ह्यांचा बॉक्स चोरीस गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
किशोर पाराजी कुलथे (वय ४१, रा.खंडेरावनगर) यांच्या मालकीच्या रिक्षेतून या वस्तू चोरीस गेल्या आहेत. कुलथे यांनी शनिवारी रात्री रिक्षा घराबाहेर उभी केली होती. मध्यरात्री चोरट्यांनी रिक्षेतील बॅटरी, स्टेपनी व पान्ह्यांचा बॉक्स या ६ हजार १०० रुपयांच्या वस्तु चोरुन नेल्या. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्ररकणी कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलताफ पठाण तपास करीत आहेत.