जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसुलीचा दबाव टाकल्याचा केलेल्या हास्यास्पद आरोपाचा जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलतर्फे हवेत फुगे सोडून प्रतिकात्मक निषेध नोंदविण्यात आला.
वाझे प्रकरणावरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस आयुक्त रणविर सिंह यांची मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये हप्ता वसुली करण्याचा दबाव टाकल्याचा पत्राद्वारे आरोप केला आहे. हा आरोप जाणीवपूर्वक मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्याने पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नैराश्यातून केला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी परमविरसिंह यांनी आरोप केला त्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूर येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. अर्थात परमविरसिंह यांचा बोलविता धनी वेगळाच असून वाझे प्रकरणात अडचणीत येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचा बचाव करण्याच्या इराद्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हास्यास्पद आरोप केल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत महाविकास आघाडीने जनतेच्या रक्षणासाठी अनेक चांगले निर्णय घेतल्याने जनतेचा विश्वास महाविकास आघाडीने संपादन केला आहे. राज्यातून सत्तेच्या बाहेर झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या भाजपाई टीमने राज्य शासनाला खोट्या नाट्या कारणांवरून बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. वाझे प्रकरणातून यथावकाश वस्तुस्थिती बाहेर येणारच आहे. परमविरसिंह हे देखील याप्रकरणातील मोहरा असून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हवेत गोळीबार करणाऱ्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अर्बन सेल तर्फे पोलीस आयुक्त परमविर सिंह यांचा निषेध करण्यासाठी शंभर फुगे हवेत सोडून निषेधाचे अभिनव प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे समन्वयक मूवीकोराज कोल्हे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन, विनोद मराठे, नाना साळुंखे, टिपू सय्यद, लालाभाई, सादिक खाटीक, सादिक शेख, विकास चौधरी, अजय सोनवणे, नावेद शेख, नासिर शेख, माजी नगरसेवक फारुख भाई, अप्पा दादा, आसिफ शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/491522695336132