जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. संक्रातीला वाण देणे याचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो, असे प्रतिपादन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले.

येथील शारदा एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे तेली समाजातील समस्त महिला भगिनींसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी सीमाताई भोळे बोलत होते. भगिनींनी मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता संताजी जगनाडे महाराज बगीचा, कालिंका माता नगर परिसर येथे हा कार्यक्रम घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महागराध्यक्ष उज्वला बेंडाळे, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, माजी नगरसेवक भारतीताई सोनवणे, रेश्मा कुंदन काळे, मंगला चौधरी, ज्योती चव्हाण, ज्योती तायडे, रंजना सपकाळे, भाजप पदाधिकारी रेखा वर्मा उपस्थित होते.
सुरुवातीला सीमाताई भोळे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. प्रसंगी सीमाताई भोळे, उज्ज्वला बेंडाळे, सरिता माळी कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. तर निर्मला रामचंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी एकमेकांशी संवाद साधत राहिले तर निश्चितच त्यांना दिवसभराच्या व आयुष्यातील ताणतणावातून मुक्त होता येते. सलोखा तयार होऊन तो जपता येतो असे निर्मला चौधरी यांनी सांगितलं. यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. त्यात विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी डॉ.सुषमा दीपक चौधरी, बेबाबाई सुरेश सुरळकर, शोभा चौधरी ,भारती रंधे, निशा पवार, पुष्पा तळेले, ममता जंजाळे, वर्षा भंडारकर, गायत्री भंडारकर, सरिता विसपुते, शैलजा निकम, कविता चौधरी, भाग्यश्री ताई, सीमा भावसार, अन्नपूर्णा मिश्रा, सुलोचना चौधरी, लिलाबाई अशोक चौधरी, रत्ना संदीप चौधरी, पूजा राहुल चौधरी, आशा उमेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.