जळगाव : प्रतिनिधी । येथील काव्यरत्नावली चौकात स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आंदोलनातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
प्रारंभी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले . तद्नंतर “नमन सावित्रीला” या क्रांतिकारी ओवीचे सादरीकरण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना वंदन करण्यात आले .ऍड कोमल गोंधळी यांनी ओवीचे गायन केले . छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ” सावित्रीबाई जन्मोत्सव ” या ५० पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले . मुकुंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन संघर्षावर विविध उदाहरणे देऊन प्रबोधन केले .
प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे व सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी मानले .
याप्रसंगी रमेश सोनवणे , मंगला सोनवणे , ऍड. राजश्री भालेराव , तेजस्विनी पाटील , ऍड. वनिता शिंपी , प्रतिभा भालेराव , चंदन बिऱ्हाडे , श्रीकांत मोरे , प्रा. सत्यजित साळवे , भैय्या पाटील , किरण कानडे , डॉ. मिलिंद बागुल , राहुल नेवे , सागर कुटुंबळे , विवेक खर्चे , ललित परदेशी , प्रभाकर सुरवाडे , सौरभ बोरसे , चारुदत्त पिंगळे , संजय तांबे , विजय करंदीकर , संतोष सपकाळे , नाना मगरे , आकाश सपकाळे , कृष्णा जमदाडे आदी उपस्थित होते