कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली- वृत्तसंस्था । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरू होईल.

तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीनं दिली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. मंगळवारी ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु होत्या. ही भारतातील पहिली लस ठरली आहे.

देशातील प्रत्येक राज्यात उद्या २ जानेवारीपासून ‘ड्राय रन’ करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.

Protected Content