कोरोना उपचारात लाल मुंग्यांची चटणी प्रभावी?

 

 

कटक ( ओरिसा ) : वृत्तसंस्था । कोरोनावरील उपचारामध्ये लाल मुंग्यांची चटणी प्रभावी आहे का?… यावर ओडिशा राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

कोरोना उपचारासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर करण्याबाबतच्या प्रस्तावावर येत्या तीन महिन्यांमध्ये निर्णय घेण्याच्या सूचना हायकोर्टाने आयुष मंत्रालय आणि सीएसआयआरच्या डायरेक्टर जनरलना केल्या आहेत. देशात आदिवासी समाज लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर करतो.

ही चटणी लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचे मिश्रण करून तयार केली जाते. ओडिशा आणि छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमधील आदिवासी सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास जाणवणे, थकवा आणि इतर आजारांमध्ये लास मुंग्यांच्या चटणीचा वापर करतात.

कोविड-१९ च्या उपचारामध्ये लाल मुंग्यांच्या चटणीच्या उपयोगाबाबत संशोधनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावरील निष्क्रियतेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर हायकोर्टाने आदेश जारी केला आहे. बरिपाडा येथीस रहिवासी असलेले इंजीनियर नयाधर पडियल यांनी ही याचिका दाखल केली होती.

पडियल यांनी २३ जून या दिवशी सीएसआयआरला आणि ७ जुलैला आयुष मंत्रालयाला आपला प्रस्ताल पाठवला होता. लाल मुंग्यांच्या या चटणीत अनेक औषधी गुण आहेत. पंचनयंत्रणेत असलेल्या संसर्गाशी लढण्यात या चटणीत असलेले अँटी बॅक्टेरियल गुण अतिशय उपयुक्त ठरतात. या चटणीत प्रथिने, कॅल्शियम आणि झिंक देखील असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Protected Content