यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावातील राहणाऱ्या एका कोरोना सदृश्य महिलेचा सावदा येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतच्या वतीने आजपासून तीन जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
जीवनाश्यक वस्तू वगळता इतर वस्तू विक्री करण्यास बंदी ठेवण्यात आली होती. मात्र असे असतांना देखील हिंगोणा येथील पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूचा गावातील काही लोकांकडून मात्र फज्जा उडविला असल्याचे दिसुन आले. काळात गावातील अत्यावश्क दुध विक्री व्यवसाय, औषधी दुकाने व दवाखाने हीच सुरू राहणार आहे. ग्रामस्थांनी तीनही दिवस घरी रहावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केला आहे. गावाच्या गल्ली बोळात काही मंडळी मात्र सटाऱ्या मारत बसली असतांना दिसत होती. गावातील अनेक व्यवसायीकांनी चौकात आपआपली दुकाने पुर्णपणे बंद ठेवली आहे. दरम्यान आज दुपारच्या वेळेस फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी हिंगोणास भेट देऊन पारिस्थितीची पाहणी ग्रामस्थांना बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्यात.