एमआयएमतर्फे विवेक ठाकरे यांची उमेदवारी दाखल

WhatsApp Image 2019 10 03 at 9.12.36 PM

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर विधानसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल (एआयएमआयएम) पार्टीतर्फे विवेक देविदास ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीद्वारे एक पक्षाचा व एक अपक्ष असे दोन वेगवेगळे अर्ज दाखल केले.

एमआयएम पार्टीचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, जळगाव मनपाच्या स्थायी समिती सदस्या नगरसेविका सईदाबी शेख युसूफ, नगरसेविका सुन्नबी राजू देशमुख, महाराष्ट्र राज्य धोबी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल कदम यांनी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडे उमेदवारी दाखल केली.
प्रारंभी रावेर शहरातील उटखेडा रोडवरील प्रशिक नगर,रुस्तम चौकात कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी उमेदवार विवेक ठाकरे,एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख,विधानसभा प्रचार समिती प्रमुख अशरफ तडवी, धोबी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल कदम, जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे राजेंद्र वारके आणि यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मेळाव्यानंतर ढोल-ताश्याच्या गजरात वाजता-गाजत उमेदवार विवेक ठाकरे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कचेरीपर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली. मेळाव्याला व मिरवणुकीत जिल्हा महासचिव मुजाहिद शेख,सचिव कलिम खान,युवा अध्यक्ष नावेद खान, फैजपूर शहराध्यक्ष इम्रान शेख, महासचिव इम्रान खान, यावल शहराध्यक्ष,यावल शहराध्यक्ष आबिदखान युनूसखान, महासचिव वसीम खान, रावेर शहराध्यक्ष अकबर शेख, महासचिव वसीम भाई, यावल शहर एमआयएमचे गफ्फार खान, युनूस खान, नासिर खान, वाजीद खान, निलेश लोखंडे, सहजाद शेख, मुज्जफर पटेल, हितेश रायपूरकर, नय्युम बेग, मनिषा ठाकरे, अझहर खान, अल्ताब पटेल, उमर पटेल, गौरव ठाकरे, सलमान खान, सुनील सुतार, शाहरुख खान, गणेश मराठे, जुबेर खान, रऊफ शेख, प्रकाश निभोरे, बालू अजित शेख, मुरलीधर चिमनकारे, अय्युब बेग,जगदिश वाघ, शीतल वाघ, धनश्री ठाकरे, अहमद पटेल, तबसुमबी शेख उमर शेख, पत्रकार नजीर शेख, अल्तमश शेख,शेख राजू,आसिफ मन्यार, तुर्कांन शेख सादिक, जुलेमीर शेख इरफान,रईस खान वसीम, वसीम शेख कुत्बउद्दीन,शोएब खान हारून खान,अबताब शेख अक्रम, नाजीम शेख अझहर,गोलू महाले तबरेज शेख,सादब खान आदी उपस्थित होते.

Protected Content