सावखेडा सिम येथे सर्पदंशाचे बालिकेचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील १२ वर्षीय बालिकेचा तिच्या घरातच सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना आज १६ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रल्हाद पुरुषोत्तम कोडी रा. सावखेडा ता. यावल यांची १२ वर्षाची मुलगी विजया प्रल्हाद कोळी ही दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरावरील पत्रांवर असलेल्या शेंगा भरीत असताना भिंतीवर दडलेला सापाने चावा घेतला. तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र घेऊन तिच्यावर प्रथम उपचार करून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. ती आदर्श विद्यालय दहिगाव येथील इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने मुलीला तिच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी गावातून होत आहे.

विशेष म्हणजे विजया हिला अक्षयतृतीयेच्या दिवशी तिच्याच घरात सापाने दर्शन दिले होते तेव्हापासून तो साप त्यांच्या घरात किंवा परिसरातच जात असल्याचे गावकऱ्यांना मधून बोलले जात आहे. साप हा चार ते पाच फूट लांबीचा अत्यंत विषारी असल्याचे तिच्या वडिलांनी प्रत्यक्ष दर्शनी बघितले. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सिकंदर तडवी करीत आहे.

Protected Content