नवी दिल्ली : : वृत्तसंस्था | कोरोना लस ही इस्लामनुसार योग्य नाही, त्यामुळे ती मुस्लिम लोकांना लावली जाऊ शकत नाही, असं काही मुस्लिम स्कॉलर्सचं म्हणणं आहे.
कोरोनावरील लस लवकरच सामान्य भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे लसीकरणासाठी देशातील नागरिकांमध्ये उत्साह आहे. लवकरात लवकर आपल्याला लस मिळावी आणि कोरोनातून मुक्तता व्हावी, यासाठी लोक प्रतिक्षा करत आहेत. मात्र, यासर्वांमध्ये काही जण असेही आहेत ज्यांनी कोरोना व्हॅक्सिनबाबत भ्रमित करणारी माहिती पसरवत आहेत. त्यांनी कोरोना लस घेण्यासही नकार दिला आहे
कोरोना लस ही इस्लामनुसार योग्य नाही, त्यामुळे ती मुस्लिम लोकांना लावली जाऊ शकत नाही, असं काही मुस्लिम स्कॉलर्सचं म्हणणं आहे.
त्यांच्या मते, लशीला बनवण्यासाठी डुकराच्या जिलेटिनचा वापर करण्यात आला आहे. इस्लाममध्ये याला हराम मानलं जातं. पण, शनिवारी जमात-ए-इस्लामीने हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की मानव जातीच्या संरक्षणासाठी आपातकालीत परिस्थितीत हराम लस लावली जाऊ शकते.
जेआयएच शरियाचे काऊंसिल सचिव डॉ. रबी-उल-इस्लाम नदवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कुठलीही अशी वस्तू जी इस्लाममध्ये हराम म्हणून सांगितली गेली असेल त्याला दुसऱ्या कुठल्या वस्तूमध्ये रुपांतरीत करण्यात आलं असेल आणि त्याने मानव जातीला वाचवलं जाऊ शकत असेल तर त्याचा वापर करण्यास हरकत नाही”.
“आपातकालीन परिस्थितींमध्ये जेव्हा हलाल लस उपलब्ध नसेल तर हराम लशीचा वापर केला जाऊ शकतो”, असंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत या लशीमध्ये काय वापरण्यात आलं आहे हे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या हे स्पष्ट झालेलं नाही की यामध्ये कशाचा वापर करण्यात आला आहे. जेव्हा आम्हाला पूर्ण माहिती मिळेल तेव्हा याचा वापर करावा की नाही याबाबत निर्देश दिले जाईल, असंही त्यांनी सांगितलं
कोरोना लस ही मुस्लिम लोकांना दिली दाऊ शकत नाही. कारण, त्यामध्ये डुकाराच्या जिलेटिनचा वापर करण्यात आला आहे, अशी घोषणा भारत, युएई आणि इंडोनेशिया सारख्या देशांतील मुस्लिम स्कॉलर्सने केली.
भारतात अखिल भारतीय जमियत उलेमा काऊंसिल आणि मुंबईतील रजा अकादमीने कोरोना लशीला हराम घोषित केलं आहे. मुस्लिमांनी ही लस घेऊ नये असं आवाहनही केलं आहे.