पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा ग्रामपंचायत बिनविरोध

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत ९ सदस्य संख्या असून ९ वार्डात प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होणार असल्याने याबाबत ४ जानेवारी २०२१ रोजी माघारीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

यात प्रदिप जिवराम पवार, मंगलाबाई अनिल पाटील, ज्योती अजय बेलदार, गणेश उत्तम पवार, अक्काबाई हुसेन तडवी, वैशाली आबा पाटील, गायत्री स्वप्निल देवरे, सचिन अनिल कोकाटे, शरद नाना पाटील हे सदस्य बिनविरोध होण्यास पात्र आहेत. चिंचपुरे ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी समाधान हरी पाटील, आबा पाटील, भागवत पाटील, गणेश पाटील सह गावातील सर्वच ग्रामस्थांनी प्रयत्न केले. बिनविरोध झालेल्या सदस्यांचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी सत्कार करुन अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.

Protected Content