चाळीसगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणारी कोरोनाची आपत्ती आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या मृत्यूमुळे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दि. २४ जून रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. या ऐवजी चाहत्यांनी कोरोनाचा प्रतिकार करणार्यासाठी झटणार्या योध्द्यांचा सन्मान करण्याचे आवाहन खासदार उन्मेषदादा यांनी केले आहे. याच आपल्यासाठी शुभेच्छा असतील असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर तसेच गेल्या सप्ताहात माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या दुःखद निधन त्याच प्रमाणे भारत-चीन सीमेवर लडाखच्या गलवान खोर्यात झालेल्या भ्याड हल्ल्यात २० जवानांना हौतात्म्य आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर विनंती केली आहे की आपण आहे त्या ठिकाणावरून आपल्या परिसरातील, संपर्कातील कोरोना योध्यांचा सत्कार करावा, त्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. त्या सत्काराचा अविस्मरणीय क्षणांचा फोटो कमेंट मध्ये शेअर करा आणि #Respect4Warrior या हॅश टॅग सह आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट केला म्हणजे माझ्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचल्या असे मी समजेल. त्या योध्यांच्या चेहर्यावरील आनंद, समाधान आणि हास्याचे क्षण हेच माझ्यासाठी सर्वाधिक मोलाच्या शुभेच्छा ठरतील अशी भावना त्यांनी व्हिडीओ संदेशात व्यक्त केल्या आहेत.
या संदेशात खा. उन्मेषदादा पाटील पुढे म्हणाले की, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी अधिकारी रुग्णवाहिका ड्रायव्हर, शेतकरी, आशा अंगणवाडी सेविका ,सरपंच ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ते, दुकानदार ,पत्रकार ,घरोघरी वर्तमानपत्र पोहचविणारे हॉकर्स बांधव यासारख्या असंख्य लोकांचे आपल्यावर उपकार आहेत असे मला वाटते. त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांचे जीवन सुरळीत चालावे यासाठी अत्यावश्यक सेवा प्रदान केल्या, आजही करत आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ हजार पेक्षा अधिक लोक आपले सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी लढत आहेत. त्यांचा हा लढा ऐतिहासिक आहे. काहींनी यात प्राणही गमावले आहेत. त्यांनी जे बलिदान केले, त्याग केला, त्यातून आपण कधी ही उतराई होणार नाही.त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नसलो तरी त्यांच्याप्रती असलेला आपला कृतज्ञता भाव आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार करून व्यक्त करू शकतो. यामुळे एक लहानशी कृती, जी त्यांना आनंद देऊन जाईल. आपण मला जो हार-गुच्छ वा भेटवस्तू देणार होतात आणि माझा सत्कार करणार होता तोच सत्कार आपल्या जवळपास असलेल्या कोरोना वॉरीयर्सयांचा करावा, आणि तो अविस्मरणीय फोटो मला पाठवा एक लहानसे फुल जरी आपण त्यांना दिले तरी त्यांच्या चेहर्यावर आनंद देऊन जाईल अशी मला खात्री आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, एखादे पुस्तक, शाल श्रीफळ किंवा लहानसा पुष्पगुच्छ देऊन या देवमाणसांचा सत्कार कोणत्याही शक्य त्या स्वरूपात केला तरी त्यातून जी भावना निर्माण होईल ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. दरवर्षी हजारो हितचिंतक वाढदिवसानिमित्त मला भेटून अथवा फोन वरून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करतात. या वर्षी आपणा सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे. या वर्षी कोरोनाच्या धर्तीवर आपण एकमेकांची काळजी घ्यावी या हेतूने माझी प्रत्यक्ष भेट होणार नसून या वर्षी आपल्या शुभेच्छा मला योध्यांच्या सत्काराचा माध्यमातूनच द्याव्यात..! मला प्रत्यक्ष न भेटता माझ्या या ७८८७८७२०१९ व्हाट्सअप नंबर वर पाठवा मी आपल्या या फोटो रुपी शुभेच्छांची वाट पाहत असल्याचे आवाहन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले आहे.
खालील व्हिडीओत पहा खा. उन्मेषदादा पाटील यांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिलेला संदेश.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/278020666942510