पहूर व भारूडखेडा येथे गावठी दारू विक्रेत्यांवर धाडी

पहूर. ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस पथकाने पहूर आणि भारूडखेडा येथील गावठी दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

पहूर पोलिस स्टेशन चे सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पहूर पोलिस स्टेशन चे हद्दीतील पहूर व भारुडखेडा येथे गावठी दारू विकणार्यांवर धाड टाकून गुन्हे दाखल करण्यात आले. आज दिवसभरात अवैध धंद्या विरोधात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी त्यांच्या सहकार्‍यांनी सट्टा पत्ता दारू अड्ड्यांवर स्वतः जाऊन अवैध धंदे करणार्‍यांना दणका दिल्याने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे.

आज दुपारी३वाजेनंतर पहूर येथील बसस्थानक परिसरात वाघुर पुला खाली गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस उपनिरीक्षक संदिप चेडे,सहा फौजदार अनिल अहिरे, पो.काँ. अनिल राठोड यांना पहूर येथील सलमान याकुब पठाण हा प्लास्टिकच्या पाउच मध्ये दारू विक्री करत असल्याचे दिसून आला. पोलिसांना पहाताच सलमानने पळ काढला. त्या ठिकाणी पोलिसांनी२०१० रूपये किमतीचे १५लिटर गावठी दारूचे पाउच जप्त केले. तसेच पहूर पोलिस स्टेशन हद्दीतील भारुडखेडा येथे संजय हिरा गोसावी हा त्याच्या घराच्या मागे गावठी दारू ची भट्टी लावतो या माहितीवरुन त्याठिकाणी पोहेकाँ भरत लिंगायत व पोकाँ.ज्ञानेश्‍वर नथ्थु बाविस्कर यांनी धाड टाकली असता पोलिसांना बघताच संजय गोसावी पळून गेला. त्या ठिकाणीं १५००रुपये किमतीचे ३००लिटर कच्चे रसायन मिळून आले. दोन्ही आरोपी विरुद्ध पहूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content