रामदेवबाबांना आयुष मंत्रालयाचा दणका; आधी पूर्ण माहिती देण्याचे निर्देश

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनावर परिपूर्ण पध्दतीत उपचार करण्याचा दावा करण्यात आलेल्या कोरोनिल या औषधाबाबत आधी आयुष मंत्रालयाला माहिती द्या, आणि नंतरच याची जाहिरात करा असे निर्देश आयुष मंत्रालयाने पतंजली कंपनीला दिलेले आहेत.

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने कोरोनील या नावाने नवीन औषध आज सादर केले असून ते कोरोनावर उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच्या जोडीला श्‍वासारी हे औषध देखील लाँच करण्यात आले आहे. दरम्यान, रामदेवबाबांच्या या दाव्यामुळे जगभरात कुतुहलाचे वातावरण निर्मित झाले असतांना आयुष मंत्रालयाने मात्र त्यांना दणका दिला आहे. पतंजली कंपनीने आमच्याकडे या औषधाची पूर्ण माहिती द्यावी. यानंतरच त्यांनी याची जाहिरात करावी असे निर्देश आयुष मंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान, पतंजलीच्या कोरोनील औषधाबाबत सोशल मीडियात जोरदार चर्वण सुरू झाले असून याच्या बाजूने आणि विरोधात अनेक युजर्स प्रतिक्रिया नोंदवत असल्याचे दिसून आले आहे.

Protected Content