नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सैन्याच्या जवानाने आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. मृत जवान महाराष्ट्रातील रहिवाशी होता. परंतु त्याचे कुटुंब राजस्थानातील अलवर इथं राहते.
मयत जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग देखील होता. त्यांच्यावर उपचार केले जात होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ५ मे रोजी त्यांना दवाखान्यात नेण्याआधी धौला कुआन येथील आर्मी रिसर्च अँड रेफरल (आरआर) हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांनी झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. त्यात त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.